दोन चलांतील रेषीय समीकरण

शाब्दिक उदाहरणे

views

04:37
आपण एकसामायिक समीकरणांवरील शाब्दिक उदाहरणे सोडवू. लक्षात ठेवा: शाब्दिक उदाहरणे सोडवताना दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करणे हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. समीकरणाची उकल काढण्याची पद्धत खालील उदाहरणांतील पायऱ्यांमधून दाखवली आहे ती आपण समजून घेऊ. उदा1) दोन संख्यांची बेरीज 36 आहे. एका संख्येच्या आठ पटीतून 9 वजा केले असता दुसरी संख्या मिळते. पायरी 1: सर्वप्रथम शाब्दिक उदाहरण काळजीपूर्वक वाचून समजून घ्या. पायरी 2: उदाहरणातील माहितीवरून राशींसाठी चले वापरा. पहिली संख्या x व दुसरी संख्या y माना. पायरी 3: चले वापरून विधाने गणिती भाषेत लिहा. उदा. वरील उदाहरणात दोन संख्यांची बेरीज 36 दिली आहे. म्हणून x + y = 36. त्यातील एका संख्येची म्हणजे लहान संख्येची आठ पट म्हणजे 8 x झाले. या 8 x मधून 9 वजा करायचे आहेत म्हणून 8 x – 9 झाले. म्हणून मोठी संख्या = y = 8 x – 9 झाले. पायरी 4: योग्य पद्धतींचा उपयोग करून गणिते सोडवा. पुढील उदाहरण सोडवू. पायरी 5: उकल मिळावा. या उदाहरणात x=55 आणि y = 31 आहे. म्हणून (5, 31) या समीकरणाच्या उकली आहेत. पायरी 6: म्हणून त्या संख्या 5 व 31 आहेत.