त्रिकोणमिती

30०, 60०, 90० मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म

views

05:26
30० मापाच्या कोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तरे. : मुलांनो, वरील आकृतीवरून 30० मापाच्या कोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तरे काढूया. आपण पाहिलेच आहे की, sin गुणोत्तर = (कोनासमोरील बाजू)/कर्ण असतो. यावरून sin30०= PQ/PR = a/2a = 1/2 ∴ sin 30० = 1/2 आहे. तसेच cos गुणोत्तर = (कोनालगतची बाजू)/कर्ण असतो यावरून cos 30०= QR/PR = (√3 a)/2a = √3/2 ∴ cos 30० = √3/2 tan गुणोत्तर = (कोनासमोरील बाजू)/(कोनालगतची बाजू) यावरून tan 30० = PQ/QR = a/(√3 a) = 1/√3 आहे वरील आकृतीवरून 60० मापाच्या कोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तरे काढूया. 0० ते 90० मापाच्या कोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तरे: ही आकृती पाहा. यात काटकोन ∆ACB मध्ये ∠C = 90० आणि ∠B = 30० आहे. sin 30० = AC/AB हे आपल्याला माहीत आहे.