त्रिकोणमिती

त्रिकोणमितीमधील महत्त्वाचे समीकरण

views

02:30
हे लक्षात ठेवूया: (sin θ)2 म्हणजे sin θ चा वर्ग हा sin2θ असा लिहितात. sin2 θ + cos2 θ = 1 हे समीकरण आपण पायथागोरसचे प्रमेय वापरून θ हा एक लघुकोन असणाऱ्या काटकोन त्रिकोणाच्या साहाय्याने सिद्ध केले. sin2 θ + cos2 θ = 1 हे समीकरण कोणत्याही मापाच्या कोनासाठी सत्य असल्यामुळे त्याला त्रिकोणमितीतील मूलभूत नित्य समानता म्हणतात. 1) 0 ≤ sin θ ≤ 1, sin θ हा 0 इतका किंवा त्यापेक्षा मोठा आहे तर 1 पेक्षा लहान किंवा 1 इतका आहे. 0 ≤ sin2 θ ≤ 1 sin2 θ हा 0 इतका किंवा त्यापेक्षा मोठा आहे तर 1 पेक्षा लहान किंवा 1 इतका आहे 2) 0 ≤ cos θ ≤ 1, cos θ हा 0 इतका किंवा त्यापेक्षा मोठा आहे तर 1 पेक्षा लहान किंवा 1 इतका आहे. 0 ≤ cos2 θ ≤ 1 cos2 θ हा 0 इतका किंवा त्यापेक्षा मोठा आहे तर 1 पेक्षा लहान किंवा 1 इतका आहे.