कंपोनंट ऑफ विंडोज

साऊंड रेकॉर्डरचा परिचय

views

1:14
आपण रेडिओवर किंवा म्युझिक सिस्टीमवर गाणी ऐकतो. ही गाणी वेगवेगळ्या गायक-गायिकांनी गायलेली असतात. पणतुम्ही स्वतःचा आवाज रेकॉर्ड झालेला ऐकला आहे का? प्रत्येकाला स्वतःचा आवाज ऐकण्याची खूप उत्सुकता असते. पूर्वी टेपरेकॉर्डर वापरायचे,ह्यामध्ये एक लाल रंगाचे बटण असायचे. टेपरेकॉर्डरमध्ये कॅसेट टाकली, लाल रंगाचे बटण दाबले की रेकॉर्डिंग सुरु व्हायचे. आता रेकॉर्डिंग करिता आपण संगणकाचाही उपयोग करु शकतो.