दशांश अपूर्णांक

शतांश स्थान

views

4:15
शतांश स्थान: मुलांनो आपण दशांश स्थानाचा अभ्यास केला त्याचे वाचन लेखन कसे करतात हे पाहिले. आता आपण शतांश स्थानाविषयी माहिती घेऊ या . 1/10 या अपूर्णांकाचे 10 समान भाग केले तर प्रत्येक भाग 1/100 एक छेद शंभर असतो. यालाच ‘एक शतांश’ असेही म्हणतात. दशांश स्थानाला लागून उजवीकडे तयार केलेल्या स्थानाला शतांश स्थान असे म्हणतात. ‘एक शतांश’ हा अपूर्णांक दशांश लेखन पद्धतीत 0.01 असा लिहितात. म्हणून 1 दशांश = 10 शतांश होतात.