दशांश अपूर्णांक

दशांश अपूर्णांकाचा उपयोग

views

2:44
दशांश अपूर्णांकाचा उपयोग : मुलांनो, दैनंदिन व्यवहारात आपण दशांश अपूर्णांकांचा वापर कशा प्रकारे करत असतो ते आता पाहू या. यासाठी आपण एक उदाहरण पाहू. पाहा 24.50 रुपये म्हणजे 24 रुपये 50 पैसे होतात. हे कसं ते आपण पाहू. बरं तुम्हाला हे माहीतच आहे की 100 पैसे म्हणजे 1 रुपया. मग 1 पैसा म्हणजे किती रुपये होतील? तर 1 पैसा म्हणजे 1 शतांश. म्हणजेच 0.01 रुपया. मग 50 पैसे म्हणजे किती ? तर 50 पैसे म्हणजे 50 शतांश रुपया. म्हणजेच 0.50 रुपया. म्हणून 24.50 रुपये म्हणजेच 24 रुपये 50 पैसे होतात. अशा प्रकारे जेव्हा एखाद्या राशीच्या मोठ्या एककाचे 10 किंवा 100 भाग करून लहान एककं निश्चित केलेली असतात, तेव्हा त्या राशीचे लेखन दशमान पद्धतीने केले जाते. जसे पहा: • 1 रुपया = 100 पैसे. म्हणून 1 पैसा = 0.01 रुपया. • 10 पैसे = 0.10 रुपया . • 35 पैसे = 0.35 रुपया. • 70 पैसे = 0.70 रुपया • 0.07 रुपया = ७ पैसे