दशांश अपूर्णांक Go Back दशांश अपूर्णांकांत लेखन views 4:58 अर्धा, पाव, पाऊण, सव्वा इत्यादींचे दशांश अपूर्णांकांत लेखन अपूर्णांक या घटकात आपण अर्धा,पाव,पाऊण,सव्वा,दीड या संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. याचे दशांश अपूर्णांकात कशा प्रकारे लेखन करायचे याची आपण माहिती घेऊ या.. अर्धा याचे व्यवहारी अपूर्णांकात लेखन आपण 1/2 असे करतो पाव’ आणि ‘पाऊण’ यांचे लेखन व्यवहारी अपूर्णांकात अनुक्रमे 1/4 आणि 3/4 असे करतात. •आता सव्वा म्हणजे 1 ¼ याचे दशांश अपूर्णांकातील लेखन कसे करतात ते आपण पाहू. सव्वा म्हणजे 1 पूर्ण + पाव भाग. आणि अपूर्णांकात पाव म्हणजेच 0.25. म्हणून 1 ¼ याचे दशांश अपूर्णांकात लेखन 1.25 असे करता येईल. •आता दीड म्हणजे 1 ½ याचे लेखन दशांश अपूर्णांकात कसे करतात ते पहा. 1 ½ म्हणजे 1 पूर्ण आणि अर्धा भाग. आणि ½ याचे लेखन अपूर्णांकात 0.50 किंवा 0.5 असे करतात हे आपल्याला माहीतच आहे. म्हणून 1 ½ याचे अपूर्णांकात लेखन 1.50 किंवा = 1.5 असे होईल. •पावणे दोन म्हणजे 1 3 /4. (एक पूर्णांक 3 छेद 4). याचे दशांश अपूर्णांकात लेखन कसे करतात ते पहा. ¾ म्हणजेच पाऊण. आणि पाऊण म्हणजेच 0.75. पावणे दोन म्हणजे 1 पूर्ण आणि पाऊण. म्हणून 1 3 /4 याचे अपूर्णांकात लेखन 1.75 असे होईल. प्रस्तावना द्शांश चिन्ह शतांश स्थान स्थानिक किंमत दशांश अपूर्णांकाचा उपयोग उदाहरणे सोडवू दशांश अपूर्णांकांत लेखन दशांश अपूर्णांकांची बेरीज उदाहरणे सोडवू दशांश अपूर्णांकांची वजाबाकी