आपली अस्थिसंस्था व त्वचा

मानवी अस्थिसंस्था

views

2:34
आपण पाहिले की शरीरातील सर्व हाडे एकसारखी नसतात. अशी सर्व लहान-मोठी हाडे एकत्र मिळून मानवी हाडांचा सांगाडा तयार होतो आणि यामुळे आपल्या शरीराला एक आकार प्राप्त होतो. म्हणजेच “शरीरातील सर्व हाडे व कुर्चा एकत्र मिळून अस्थिसंस्थेची रचना होते. शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या आणि शरीराच्या आतील इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या संस्थेला अस्थिसंस्था म्हणतात.