आपली अस्थिसंस्था व त्वचा

अंतस्त्वचा

views

3:00
• बाह्यत्वचेच्या खालील थराला `अंतस्त्वचा` म्हणतात. ही आपल्याला बाहेरून दिसत नाही. ह्या अंतर त्वचेच्या खाली रक्तवाहिन्या व मज्जातंतूचे जाळे असते. मज्जातंतू मुळे आपल्याला वस्तूंच्या स्पर्शाची जाणीव होते. जेव्हा आपल्याला खरचटतं किंवा अपघात होतो (लहान अपघात) किंवा कापलं जातं तेव्हा वेदना होतात. त्या वेदना ह्या मज्जातंतूमुळेच जाणवतात. जखम मोठी असेल तर रक्तही येते. ते ह्या रक्तवाहिन्यांमुळे. रक्त शरीराच्या जखम झालेल्या त्व्चेबाहेर येते.