इतिहासाची साधने Go Back भौतिक साधने भाग 2 views 5:13 भौतिक साधने भाग 2- नाणी : भौतिक साधनांमधील तिसरे साधन म्हणजे नाणी. मागील इयत्तेत आपण पाहिले की पूर्वीचे राजे नाणी पाडत असताना त्यावरती एका बाजूला देवतेची प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूला नाणी पाडणाऱ्या राजाची प्रतिमा कोरीत असत. या नाण्यांमध्ये सोने ,चांदी, तांबे यांसारख्या धातूंचा वापर केला जात असे. नाण्यांवरून त्या काळी राज्यकर्ता कोण होता, त्याचा कार्यकाल कोणता होता, त्याचा राज्यकारभार कसा होता, त्याची धार्मिक संकल्पना कशी होती, आर्थिक स्थिती आणि आर्थिक व्यवहार कसे होते याची माहिती मिळते. तसेच विविध काळातील धातुशास्त्राच्या प्रगतीची माहितीही या नाण्यांवरून मिळते. नाण्यांवरून धार्मिक समन्वय दिसून येतो. उदा. मुघल बादशहा सम्राट अकबरच्या काळातील नाण्यांवर राम-सीता यांचे चित्र होते. तसेच म्हैसूरचा सम्राट हैदरअलीच्या नाण्यांवर हिंदू दैवत शिव पार्वती यांचे चित्र होते. पेशव्यांच्या काळातील नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत होता. मुस्लीम राजांना हिंदू दैवतांचे वावडे नव्हते. आणि हिंदू पेशव्यांना अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर करण्यात काही गैर वाटत नव्हते. यावरून आपल्याला त्याकाळातील हिंदू-मुस्लिमांतील समन्वयाची भावना कळून येते. तर अशा प्रकारे नाण्यांमुळे इतिहास समजण्यास मदत होत असे. प्रस्तावना भौतिक साधने भाग 1 भौतिक साधने भाग 2 लिखित साधने भाग 1 लिखित साधने भाग 2 मौखिक साधने ऐतिहासिक साधनाचे मूल्यमापन