इतिहासाची साधने

ऐतिहासिक साधनाचे मूल्यमापन

views

2:15
ऐतिहासिक साधनाचे मूल्यमापन : इतिहासाचा अभ्यास करताना ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यातील खरेखोटेपणा, बनावटपणा इतिहासकारांना तपासावा लागतो. यातील खरी व खोटी साधने कोणती हे शोधावे लागते. केवळ जुना लिखित पुरावा आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवता येत नाही. काही अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरविता येतो. लिखित साधनांत गैरप्रकार होऊ शकतो. अशावेळेस लेखकाचा खरेखोटेपणा, त्याचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. उदा. एखादा लेखक जर शिवाजी महाराजांचा द्वेष करणारा असेल तर त्याच्या लिखाणामध्ये महाराजांचा चांगल्या गुणांचा विचार कमी आणि वाईट गुणांना जास्त महत्त्व दिले असेल. तसेच काही लेखक आपले साहित्य जास्तीत जास्त लोकांना आवडावे म्हणून, छोटीशी गोष्ट अतिशय रंगवून(लांबवून) सांगतात, त्यामुळे त्या लेखातील मूळ हेतू नष्ट होतो. त्यातील खरेपणा ही नाहीसा होतो. ही माहिती ऐकीव आहे की त्याने स्वत: पाहिलेली आहे, यालाही महत्त्व असते. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत, अति मनोरंजक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी एकाच साधनाचा उपयोग न करता त्या काळातील इतर साधनांचा उपयोग करून माहिती पडताळून पाहावी लागते. इतिहासाचे लिखाण करताना लेखकाचे मत कोणत्याही एका पक्षाकडे किंवा एख्याद्या व्यक्तीकडे झुकलेले नसावे. त्याने नेहमी सर्व बाजूंचा विचार करून लिखाण करणे गरजेचे असते, तरच त्याचे लिखाण योग्य होईल.