इतिहासाची साधने Go Back लिखित साधने भाग 1 views 2:58 इतिहासाच्या साधनांमधील दुसरे साधन म्हणजे लिखित साधन होय. लिखित म्हणजे लिहून ठेवलेली. ज्याच्या आधारे आपल्याला विशिष्ट काळातील निश्चित माहिती मिळू शकते. पूर्वीच्या काळी देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी यांसारख्या लिप्यांचा वापर होत असे. या लिप्यांमधील विविध भाषांची भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फर्माने म्हणजे आदेश, चरित्र मिळाली आहेत. यांच्या मदतीने आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच त्या काळातील खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचार-विचार, सण- समारंभ यांचीही माहिती मिळते. हे सर्व साहित्य लिखित स्वरूपात असल्याने या साहित्यास इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. भूर्ज नावाच्या वृक्षाच्या पानांवर लिहून ठेवलेल्या लिखाणाला भूर्जपत्रे असे म्हणतात. पूर्वीची माहिती, ज्ञान, अनेक महत्त्वाच्या गोष्टी या आपल्याला लिखित साधनांतून माहीत होतात. प्राचीन काळी युआनश्वांग, फाहियान यासारंख्या चिनी प्रवाशांनी लिहिलेल्या ग्रंथांमुळे आपल्याला प्राचीन काळाची माहिती मिळाली. मध्ययुगीन काळातही परकीय प्रवासी भारतात येत होते, त्यांनी त्यांचे अनुभव आपल्या प्रवासवर्णनांमध्ये लिहिले आहेत. इ.स.वी सनाच्या १० व्या शतकात इतिहासकार अल्- बेरुनी याने भारताला भेट दिली. त्याने भारतातील अनुभव सांगणारा, तारीख – ई- हिंद हा ग्रंथ लिहिला. तसेच आणखी एक अरब इतिहासकार इब्न—बतुता यानेही भारताला भेट दिली, त्याचा “सफरनामा“ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. प्रस्तावना भौतिक साधने भाग 1 भौतिक साधने भाग 2 लिखित साधने भाग 1 लिखित साधने भाग 2 मौखिक साधने ऐतिहासिक साधनाचे मूल्यमापन