दशांश अपूर्णांक

दशांश अपूर्णांकात आणखी काही

views

3:46
दशांश अपूर्णांकात आणखी काही संख्या कशा लिहितात ते पहा : 750 ग्रॅम = 750/ 1000 किग्रॅ = 0.750 किग्रॅ 2 किमी 325 मी = २ किमी + 325/1000 किमी = 2 किमी + 0.325 किमी = 2.325 किमी. 75 मिली = 75/1000 ली = 0.075 ली. तर अशा प्रकारे आपण विविध एकके दशांश अपूर्णांकाच्या स्वरुपात लिहू शकतो. शि: मुलांनो, कोणतीही संख्या घेतली की त्या संख्येतील प्रत्येक अंकाचे निश्चित स्थान असते. आणि त्या स्थानाची एक किंमत असते. उदाहरणार्थ 512 ही संख्या जर तुम्ही घेतली तर त्या मध्ये 2 हे एकक असून त्याची किंमत 2 आहे. 1 हा दशक असून त्याची किंमत 10 आहे. आणि 5 शतक स्थानी असून त्याची किंमत 500 आहे. हे आपल्याला माहीत आहे. याच प्रमाणे दशांश पूर्णांकातील संख्यांचेही एक निश्चित स्थान आणि किंमत असते. ते स्थान आणि त्यांची किंमत कोणकोणती असते ते आपण आता पाहू. यासाठी आपण 378.025 या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत खालील सारणीमध्ये लिहू. म्हणजे तुम्हाला दशांश अपूर्णांकातील संख्यांची स्थानिक किंमत कशी लिहितात ते अधिक स्पष्ट होईल.