दशांश अपूर्णांक Go Back बेरीज आणि वजाबाकीची गणिते views 3:13 मुलांनो आता आपण दशांश अपूर्णांकातील संख्यांची बेरीज आणि वजाबाकीची गणिते सोडवू. 1) शि: आपण हे पहिले उदाहरण सोडवू : 905.5 + 27.195 = ? किती हे उदाहरण सर्वप्रथम आपण उभ्या मांडणीत लिहूया. 905.500 + 27.195 (हे उदाहरण उभ्या मांडणीत दाखवा.) 932.695 या गणिताची बेरीज करताना सुरवात सहस्त्रांशापासून करू. सहस्त्रांशात 5 + 0 आहेत, म्हणून उत्तरात 5 लिहिले. नंतर शतांश स्थानात 9+0 आहेत. म्हणून त्याचे उत्तर 9 लिहिले. आता दशांश स्थानात 1+5 आहेत म्हणून उत्तरात 6 लिहिले. पहा गणितात दशांश चिन्ह हे 3 अंकांनंतर असल्यामुळे उत्तरातही 3 अंकानंतर दशांश चिन्ह लिहिले. आता एकक स्थानाची बेरीज 7+5 = 12 झाली. म्हणून त्यातील 2 हे उत्तरात लिहिले आणि हातचा 1 दशकात मिळवला. दशकाच्या घरातील 0+2+ हातचा 1 मिळून 3 झाले. ते उत्तरात लिहिले. आणि शेवटी शतकातील 9 तसेच उत्तरात मांडले. म्हणून 905.5 + 27.195 = 932.695 झाले. बेरीज वजाबाकी एककांवरील उदाहरणे दशांश अपूर्णांकात आणखी काही बेरीज आणि वजाबाकीची गणिते वजाबाकीचे उदाहरण संख्यारेषेवर दशांश अपूर्णांक दर्शवणे नियम समजून घेऊया दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर दशांश अपूर्णांकाचा गुणाकार दशांश अपूर्णांकांचा भागाकार