दशांश अपूर्णांक

संख्यारेषेवर दशांश अपूर्णांक दर्शवणे

views

4:41
संख्यारेषेवर दशांश अपूर्णांक दर्शवणे. : मुलांनो. संख्यारेषेवर दशांश अपूर्णांक दाखवण्यासाठी प्रथम संख्यारेषेवरील प्रत्येक एककाचे दहा समान भागांत विभाजन करा. अशी ही संख्यारेषा तयार झाल्यानंतर मग त्यावर संख्या दाखवा. उदा. १) 1.5 2) 0.3 3) 3.5 व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर. : आता आपण व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे हे पाहूया. याठिकाणी 1/2, 1/4 असे काही व्यवहारी अपूर्णांक दिले आहेत. चला आपण त्यांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करू. पहा, आपल्याला ½ या व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रुपांतर करायचे आहे. म्हणून प्रथम आपण 2 ने गुणले असता छेद्स्थानी 10 येईल अशी एखादी संख्या घेऊ. आणि नंतर त्याच संख्येने अंश व छेद यांना गुणू. जर आपण 5 ही संख्या घेतली तर छेदस्थानी 2 × 5 = 10 झाले. आणि अंश्स्थानी 1 ×5 = 5 झाले. म्हणजेच आपल्याला 5/10 हा अपूर्णांक मिळाला. व त्याचे दशांश अपूर्णांकात लेखन 0.5 असे करतात.