दशांश अपूर्णांक

दशांश अपूर्णांकाचा गुणाकार

views

4:53
दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. मुलांनो, या आधी आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकीची उदाहरणे पाहिली. आता आपण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा ते पाहू. दशांश अपूर्णांकांचा गुणाकार आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. कसे ते पहा: रीत 1 उदा. :- समजा आपल्याला 5.7 × 7 या दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करायाचा आहे. तर प्रथम आपण दशांशचिन्हाचा विचार न करता पूर्ण संख्येचा गुणाकार करू. म्हणजेच 57 × 7 यांचा गुणाकार करू. यांचा गुणाकार केला असता 399 ही संख्या मिळाली. नंतर गुणाकारातील एकक स्थानापासून सुरूवात करून गुण्य व गुणकातील एकूण दशांशस्थळे मोजून डावीकडे दशांशचिन्ह देऊ. या उदाहरणात गुण्य व गुणकातील दशांशस्थळे आहेत. म्हणून दशांश चिन्ह उजवीकडून अंक सोडून म्हणजे 39 नंतर दिला आहे.