चौकोन

चौकोनाचे वाचन व लेखन

views

3:3
चौकोनाचे वाचन व लेखन : मुलांनो, चौकोन कसा तयार होतो ते आपण पाहिले. आता आपण या चौकोनाचे वाचन कसे करतात ते पाहू. तुम्ही सर्वांनी घड्याळ पाहिले आहे. या घड्याळाचे तीनही काटे एकाच दिशेने फिरतात. ते कधीही उलटे फिरत नाहीत. पण चौकोनाचे वाचन मात्र तुम्ही सरळ आणि उलट दोन्ही मार्गाने करू शकता. म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने क्रमाने कोणत्याही शिरोबिंदू पासून सुरवात करून आपण चौकोनाला नाव देऊ शकतो. उदा. पाहा जर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपण A या बिंदू पासून सुरवात केली, तर आपला चौकोन ABCD तयार होईल. आणि या उलट जर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने A बिंदू पासून सुरवात केली तर आपला चौकोन ADCB तयार होईल. याच पद्धतीने तुम्ही चौकोनाच्या कोणत्याही शिरोबिंदू पासून सुरवात करून चौकोनाला वेगवेगळी नावे देऊ शकता. अशा या एकाच चौकोनाचे वाचन आपण वेगवेगळ्या शिरोबिंदूं पासून करू शकतो. त्यामुळे एकाच चौकोनाला वेगवेगळी नावे मिळतात. चौकोनाचे वाचन करताना आपण चौकोन ADCB असे करतो. पण याचे लेखन करताना मात्र आपण चौकोन हा शब्द न लिहिता सांकेतिक भाषेत (चौकोन) असे लिहितो.