चौकोन

चौकोनाच्या लगतचे कोन

views

3:7
चौकोनाच्या लगतचे कोन: मुलांनो, आतापर्यंत आपण चौकोनाच्या बाजूंविषयी माहिती घेतली. आता आपण चौकोनाच्या कोनांची माहिती घेऊ. आता हा चौकोन PQRS पहा. यामध्ये PQS, QSR, SRP, आणि RPQ हे चार कोन आहेत. जर तुम्ही पाहिले PQS आणि QSR या दोन कोनांमध्ये बाजू QS ही सामाईक आहे. म्हणून हे दोन कोन लगतचे कोन आहेत. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की, चौकोनाच्या ज्या दोन कोनांमध्ये एक बाजू सामाईक असते त्या कोनांना चौकोनाचे लगतचे कोन असे म्हणतात. मग आता मला सांगा या चौकोनातील आणखी कोणकोणते कोन लगतचे कोन आहेत?वि: सर, QSR, SRP, हे लगतचे कोन आहेत कारण त्यांची बाजू SR ही सामाईक बाजू आहे. तसेच SRP, आणि RPQ हे देखील लगतचे कोन आहेत. कारण त्यांची बाजू RP ही सामाईक आहे. शि: बरोबर! पुढील कोन कोणते आहेत? वि: सर RPQ आणि PQS हे लगतचे कोन आहेत. कारण यांची बाजू PQ ही सामाईक आहे. शि: अगदी बरोबर ! म्हणजे आता तुम्ही कोणत्याही चौकोनातील लगतचे कोन सहज ओळखू शकता.