चौकोन

चौकोनाच्या लगतच्या बाजू

views

3:50
चौकोनाच्या लगतच्या बाजू : मुलांनो, आपण चौकोनाच्या बाजू कोणत्या असतात हे तर पाहिले. आता चौकोनाच्या लगतच्या बाजू कोणत्या असतात ते आपण पाहू. मला सांगा चौकोन ABCD च्या बाजू कोण - कोणत्या आहेत? वि: सर, बाजू AB, बाजू BC, बाजू CD आणि बाजू DA या चार बाजू आहेत. शि: बरोबर. आता मला सांगा बाजू AB, आणि बाजू BC यामध्ये तुम्हाला काही साम्य दिसते आहे का? वि: हो सर. या दोन्ही बाजूंमध्ये B हा बिंदू आहे. शि: बरोबर ! म्हणजेच या दोन्ही बाजूंमध्ये बिंदू ‘B’ हा सामाईक शिरोबिंदू असल्याने तो या दोन्ही बाजूंना एकमेकांशी जोडतो. म्हणून बाजू AB, आणि बाजू BC ह्या लगतच्या बाजू आहेत. म्हणून आपल्याला असे म्हणता येईल की, चौकोनाच्या ज्या दोन बाजूंना एक सामाईक शिरोबिंदू असतो त्या बाजूंना चौकोनाच्या लगतच्या बाजू असे म्हणतात. मग आता तुम्ही मला सांगा या चौकोनामध्ये आणखी कोणकोणत्या बाजू लगतच्या बाजू आहेत? वि: सर बाजू BC, आणि बाजू CD या लगतच्या बाजू आहेत. कारण त्यांचा C हा शिरोबिंदू समान आहे. तसेच बाजू CD आणि बाजू DA या पण लगतच्या बाजू आहेत. आणि यांचा शिरोबिंदू D समान आहे. तसेच बाजू DA आणि बाजू AB याही लगतच्या बाजू आहेत. कारण त्यांचा सामाईक शिरोबिंदू A आहे. शि:अगदी बरोबर! मग मला सांगा सगळ्या मिळून चौकोनाच्या एकूण किती लगतच्या बाजूंच्या जोड्या तयार झाल्या? वि: सर, एकूण चार जोड्या तयार झाल्या आहेत. शि:अगदी बरोबर ओळखलंत सगळ्यांनी.