चौकोन

चौकोनाचा कर्ण

views

3:34
चौकोनाचा कर्ण:- “मुलांनो, आतापर्यंत आपण चौकोनाच्या बाजू आणि त्याचे कोन पहिले. आता आपण चौकोनाचा कर्ण म्हणजे काय ते पाहू. आता हा चौकोन ABCD पहा. या मध्ये ABC, BCD CDA आणि DAB हे चौकोनाचे चार कोन आहेत. आणि बिंदू A, बिंदू B, बिंदू C, आणि बिंदू D हे त्याचे शिरोबिंदू आहेत. जर आपण या संमुख कोनांच्या शिरोबिंदूंना जोडणारे रेषाखंड काढले तर रेख AC व रेख BD तयार होते. म्हणून रेख AC व रेख BD या चौकोन ABCD चे कर्ण आहेत. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की, चौकोनाच्या संमुख कोनांचे शिरोबिंदू जोडणारे रेषाखंड म्हणजे चौकोनाचे कर्ण असतात. चौकोन PQRS चे कर्ण कोणते आहेत सांगा बरं? वि: सर रेख QR आणि रेख PS हे चौकोन PQRS चे कर्ण आहेत. शि: अगदी बरोबर! पण मला सांगा कर्ण QR हा कोणत्या दोन कोनांचे शिरोबिंदू जोडतो आहे? वि PQS आणि SRP या दोन कोनांचे शिरोबिंदू जोडतो. शि: आणि कर्ण PS हे कोणत्या दोन कोनांचे शिरोबिंदू जोडतो आहे? वि: RPQ आणि RSQ या दोन कोनांचे शिरोबिंदू जोडतो आहे. शि: बरोबर !