चौकोन Go Back बहुभुजाकृती views 3:53 बहुभुजाकृती :- मुलांनो, ज्यांच्या तीन भुजा एकमेकांना जोडलेल्या असतात अशा आकृतीला त्रिकोण म्हणतात. तसेच ज्यांच्या चार भुजा एकमेकांना जोडलेल्या असतात अशा आकृतीला चौकोन म्हणतात हे आपण पाहिले आहे. आता ज्यांच्या भुजा चारपेक्षा जास्त असून त्या एकमेकांना जोडलेल्या असतात अशा आकृतींना काय म्हणतात ते आपण पाहू. मुलांनो, तुम्ही कधी सदाफुलीचे फूल पाहिले आहे का? या फुलांना 5 पाकळ्या असतात. चला आपण या फुलाचे चित्र काढू. ही झाली आपल्या सदाफुलीच्या फुलाची आकृती तयार. आता आपण या पाकळ्यांची टोके क्रमाने जोडू. सर्व पाकळ्या जोडल्यानंतर पाहा एक नवीन आकृती तयार झाली आहे. ही आहे बहुभुजाकृती. म्हणजेच चार किंवा चारपेक्षा जास्त बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला बहुभुजाकृती असे म्हणतात. आता या जोडलेल्या बिंदूंना आपण अनुक्रमे ABCDE अशी नावे देऊ. पहा या आकृतीला पाच भुजा आहेत. म्हणून या आकृतीला पंचकोन असे म्हणतात. समजा माझ्याकडे 6 पाकळ्यांचे वेगळे फूल असते तर त्यातून तयार होणाऱ्या आकृतीला किती बाजू तयार झाल्या असत्या? वि: सर सहा बाजू आणि सहा कोन तयार झाले असते. शि: बरोबर! अशा आकृतीला षट्कोन असे म्हणतात. जर एखाद्या आकृतीला सात बाजू असतील तर त्या आकृतीला सप्तकोन असे म्हणतात. आणि ज्या आकृतीला आठ बाजू असतील त्यांना अष्टकोन असे म्हणतात. या सर्व प्रकारच्या आकृत्या म्हणजेच बहुभुजाकृती आकृत्या होत. प्रस्तावना चौकोन चौकोनाचे वाचन व लेखन चौकोनाच्या लगतच्या बाजू चौकोनाच्या लगतचे कोन चौकोनाचा कर्ण बहुभुजाकृती