अपूर्णांकांवरील क्रिया Go Back अंशाधिक अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांत रूपांतर views 4:01 अंशाधिक अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांत रूपांतर.मुलांनो आज आपण प्रथम अंशाधिक अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांत रूपांतर कसे करायचे ते पाहू. यासाठी एक उदाहरण सोडवू.शि: समजा मी आज ५ सफरचंदे आणली आहेत. ती २ जणांत वाटायची आहेत. तर प्रत्येकाच्या वाट्याला किती सफरचंद येणार?2 सफरचंदं + 2 सफरचंदं + 1 सफरचंदआता प्रथम दोघांनी एक एक सफरचंद घ्या. आता उरली ३. पुन्हा एक एक घ्या. आता उरले एक. आता या एकाचे पुन्हा दोन समान भाग करावे लागतील. म्हणजे दोघांना अर्धे –अर्धे सफरचंद मिळेल. पूर्ण मिळणार नाही. म्हणजे बघा हं, प्रत्येकाला दोन पूर्ण आणि एक अर्धे सफरचंद मिळाले.म्हणजेच एकूण सफरचंद 5.ती किती जणांना वाटली तर २ हे आपण 5/2 = पाच अंश व छेद 2 असे लिहू.प्रत्येकाला किती सफरचंदे वाटणीला आली ? तर 2 पूर्ण + 1 अर्धे = 2 1/2 म्हणजेच इथे आपण 5 ला 2 ने भागले तर भागाकार 2 म्हणजे पूर्ण भाग येतो व बाकी जी उरते तो अपूर्ण भाग.म्हणून 5/2 = 2 पूर्णांक 1/2 ( 1 छेद 2 ) असे लिहिता येईल.5/2 या अपूर्णांकात अंश हा 5 आहे. तर छेद हा 2 आहे. आणि अंश छेदापेक्षा मोठा आहे.म्हणून 5/2 ला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. आणि 5 वस्तूंचे 2 समान भाग केल्यावर 2 पूर्ण व एक अर्धा 1/2 भाग मिळतो. म्हणून या अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणतात.म्हणून 5/2 = 2 1/2 अंशाधिक अपूर्णांक = पूर्णांक + अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांत रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची वजाबाकी मिश्र शाब्दिक उदाहरणे संख्यारेषेवर अपूर्णांक दाखवणे अपूर्णांकांचा गुणाकार अपूर्णांकांचा भागाकार