अपूर्णांकांवरील क्रिया Go Back अपूर्णांकांचा गुणाकार views 4:03 अपूर्णांकांचा गुणाकार : आता आपण अपूर्णांकांचा गुणाकार कसा सोडवतात ते पाहू. शि: माझ्याकडे 20 निरनिराळ्या रंगांच्या गोट्या आहेत. त्यापैकी 2/5 गोट्या निळ्या रंगाच्या आहेत. तर एकूण किती गोट्या निळ्या रंगांच्या आहेत? या गोट्या आता मला समान वाटायच्या असतील तर कोणकोणत्या प्रकारे आपण गट तयार करू शकतो? वि: 2 चे 10 गट, 4 चे 5 गट, 5 चे 4 गट, किंवा 10 चे 2 गट. माझ्याकडे एकूण निरनिराळ्या रंगांच्या 20 गोट्या आहेत. त्यातील 2/5 भाग निळ्या गोट्या आहेत. म्हणजेच एकूण 20 गोट्यांच्या समान 5 भागांपैकी 2 भाग गोट्या निळ्या आहेत. एकूण 20 गोट्या. या समान 5 भागांपैकी 2 भाग निळ्या गोट्या आहेत. निळ्या गोट्यांचे 2 भाग एकत्र केले तर एकूण 8 गोट्या झाल्या. म्हणजेच 8 गोट्या निळ्या रंगांच्या आहेत. अंशाधिक अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांत रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची वजाबाकी मिश्र शाब्दिक उदाहरणे संख्यारेषेवर अपूर्णांक दाखवणे अपूर्णांकांचा गुणाकार अपूर्णांकांचा भागाकार