अपूर्णांकांवरील क्रिया

पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर

views

3:36
पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. आता आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसे करतात ते पाहू. समजा आपल्याला 3 1/4 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे. तर ते कसे करायचे ते आपण पाहू. पहा या अपूर्णांकात 3 हा पूर्णांक आहे. आणि 1/4 हा अपूर्णांक आहे. अपूर्णांक 1/4 म्हणजेच एका पूर्ण वस्तूचा 4 था समान भाग. हे उदाहरण सोडविण्यासाठी आपण 4 आयताकृती समान पुठ्ठे घेऊ. आता आपण या 3 पूर्ण पुठ्ठ्यांचे प्रत्येकी 4 समान भाग केले. म्हणजे एकूण 4 + 4 + 4 = 12 भाग म्हणजे 12 अंश झाले आहेत. आणि चौथ्या पुठ्ठ्याचा 1/4 भाग = 1 भाग म्हणजे 1 अंश यात मिळवायचा आहे. आता तीन पुठ्ठ्यांचे 12 व चवथ्या पुठ्ठ्याचा 1 भाग मिळून 13 अंश झाले आहेत.