अपूर्णांकांवरील क्रिया

अपूर्णांकांचा भागाकार

views

3:04
अपूर्णांकांचा भागाकार : एखाद्या संख्येला अपूर्णांकाने भागणे म्हणजे त्या संख्येला त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे. अपूर्णांकांचा भागाकार समजण्यासाठी आपण 1 गणित सोडवू. गुळाची प्रत्येक ढेप 1 किलोग्रॅमची आहे. आणि एकूण 6 ढेपा आहेत. जर एका कुटुंबाला महिन्याला दीड किलो गूळ लागत असेल, तर या 6 ढेपा एकूण किती कुटुंबांना पुरतील? तर 1 किलोग्रॅम च्या एकूण 6 ढेपा आहेत. प्रत्येक कुटुंबाला महिन्याला दीड किलो गूळ लागतो. दीड किलोग्रॅम म्हणजे एक पूर्ण व एक अर्धा 1 + 1/2 = म्हणजेच 3/2 दिलेला गूळ किती कुटुंबांना पुरेल हे काढण्यासाठी भागाकार करू. म्हणून 6 ÷ 3/2 = 6/1 ÷ 3/2 = 6/1 × 2/3 = 12/3 = 4 (व्यस्त गुणाकार केला ) = म्हणून 6 गुळाच्या ढेपा, प्रत्येकी दीड किलो प्रमाणे 4 जणांमध्ये समान वाटल्या.