बँक व सरळव्याज

बँकेमध्ये समाजातील विविध प्रकारच्या लोकांचे व्यवहार

views

4:25
बँकेमध्ये समाजातील विविध प्रकारच्या लोकांचे व्यवहार सुरू असतात. आता हे चित्र पहा. आणि मला सांगा बँकेशी व्यवहार करणाऱ्या कोणकोणत्या व्यक्ती चित्रात दिसत आहेत? (पाठ्यपुस्तक पान क्र.74) विद्यार्थी:- व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी, महिला बचतगट, विद्यार्थी. शिक्षक:-अगदी बरोबर! पाहा आता तर विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचे व्यवहार बँकातून करता येतात. कारण शासनाकडून मिळणारी शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातच जमा होते. हे व्यापारी स्वत:च्या व्यवसायातून जमा झालेले पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी किंवा व्यवसायासाठी लागणारा पैसा बँकेतून काढण्यासाठी येतात. आजकाल तर अशा प्रकारचे बहुतांश व्यवहार चेकने किंवा नेट बँकिंगनेच केले जातात. हे शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक बँकेमध्ये कर्ज मिळविण्यासाठी येतात. बचत गटाच्या महिला त्यांनी केलेली बचत बँकेत जमा करण्यासाठी तसेच शासनाकडून त्यांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी येतात. वृद्ध मंडळी बँकेत त्यांची पेन्शन घेण्यासाठी जातात. तर अशा प्रकारे समाजातील अनेक प्रकारच्या लोकांचा बँकेशी पैशाच्या देवाण घेवाणीसाठी संबंध येत असतो. मुलांनो, प्रत्येक देशाचे स्वत:चे वेगळे चलन असते. आपले भारतीय चलन आहे रुपया. त्यामुळे आपल्या देशातील सर्व आर्थिक व्यवहार रुपया या चलनातूनच चालतात. बँकेतील खाते उघडणे : बँकेचे व्यवहार करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बँकेमध्ये आधी आपले खाते उघडावे लागते. आपण बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी जातो, त्यावेळेस आपल्याला काही कागदपत्रे बँकेला सादर करावी लागतात. ती कोणती कागदपत्रे असतात ते पहा: पत्त्यासंदर्भात पुरावा :- बँकेसोबत व्यवहार करताना बँकेच्या बऱ्याच योजना आपल्या घरच्या पत्त्यावर पाठवल्या जातात. शिवाय खाते उघडल्यानंतर बँकेकडून काही कागदपत्रेही पत्त्यावर पाठवली जातात. त्यामुळे आपला बरोबर पत्ता बँकेकडे असावा लागतो. हा पत्ता खरा आहे की नाही हे पडताळून पाहण्यासाठी बँकेला आपल्या नावाचे किंवा आपल्या घरातील कुटुंब प्रमुखाचे रेशनकार्ड, वीजबिल, टेलीफोन बिल, रहिवाशी पुरावा किंवा दाखला तसेच शासकीय ओळखपत्र म्हणजेच आपल्या पत्त्याचा कोणताही पुरावा सादर करावा लागतो.