बँक व सरळव्याज

चालू खाते

views

2:53
चालू खाते : बँक मध्ये ‘चालू खाते’ हा एक प्रकार असतो. यालाच इंग्रजीत current account असे म्हणतात. या खात्यातून आपण कितीही वेळा पैसे काढू शकतो. पण या खात्यातील पैशांवर व्याज मात्र मिळत नाही. कोणीही उद्योजक किवा /स्वत:च्या मालकीचा व्यवसाय असणारे /भागीदारीत व्यवसाय करणारे/ किवा सार्वजनिक अथवा खाजगी कंपन्या बँकेत आपले ‘चालू खाते’ उघडू शकतात. हे खाते उघडण्यासाठी पत्ता आणि ओळखीच्या पुराव्यासोबत व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र , भागीदारी करार हे पुरावेही सादर करावे लागतात. मुदत बंद ठेव ( FFixed Deposit ) : बँकमध्ये आपण ठराविक मुदतीसाठी पैसे ठेवू शकतो. अशा खात्यास मुदत बंद ठेव खाते म्हणतात. या मध्ये व्याज जास्त मिळते. मुदत ठेवींचा कालावधी हा कमीतकमी ७ दिवसांपासून ते जास्तीत जास्त १० वर्षांपर्यंत असतो. प्रत्येक बँकेचा भिन्न कालावधीसाठी व्याज दर वेगवेगळा असतो. हे व्याज दर स्थिर पद्धतीचे असतात. ठेव ठेवल्या दिवशी जो व्याजदर कबूल केला असेल तो मुदत संपेपर्यंत बदलत नाही; मग भविष्यात व्याजदर कमी होवो अथवा जास्त. त्यामुळे हे खाते उघडणाऱ्या व्यक्तीला माहिती असते की अमुक एक कालावधी नंतर मला अमुक इतकी रक्कम मिळणार आहे. त्यामुळे तो भविष्यासाठी काही प्रमाणात निश्चिंत राहतो. आवर्ती ठेव (Recuring Deposite ) : आवर्त ठेव म्हणजे, खातेदारला बँकेत एक विशिष्ट रक्कम प्रत्येक महिन्याला एका विशिष्ट कालावधीपर्यंत जमा करावी लागते. हा कालावधी साधारणता: एक ते पाच वर्षांचा असतो. या खात्यामुळे खातेदार एक विशिष्ट रक्कम प्रत्येक महिन्याला जमा करून त्याची काही वर्षानंतर एकगट्ठा रक्कम मिळवू शकतो. या खात्यावरील व्याज ठराविक जमा योजनेच्या दराप्रमाणे तीन महिन्याने दिले जाते. या ठेवीत आपण कमीत कमी १००/- रुपयांपासून रक्कम दरमहा गुंतवू शकता. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या खात्यांमधून आपण आपली बचत करू शकतो. आणि त्यावर व्याज मिळवू शकतो.