बँक व सरळव्याज

सरळव्याज

views

5:04
सरळव्याज : सरळव्याजाची आकारणी ही 1 वर्षासाठी असते. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीची आकारणी आपल्याला काढायची असेल तर ती आकारणी जास्त गुंतागुंतीची असू असते. आणि ही काही वेळा सरळव्याजापेक्षा वेगळी असते . काही उदाहरणा व्दारे सरळ व्याज कसे काढायचे ते आपण आता पाहूया उदाहरण 1 : विनिताने द.सा.द.शे 7 दराने बँकेत 15000 रुपये 1 वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले, तर तिला वर्ष अखेरीस किती व्याज मिळेल? शि: मुलांनो, पाहा या उदाहरणात विनिताने रू 15000 ठेव म्हणून बँकेत ठेवले आहेत. म्हणून तिचे मुद्दल झाले रू 15000. तिची मुदत आहे 1 वर्ष आणि व्याजाचा दर आहे शंभरासाठी रू 7. जर तिचे मुद्दल वाढले तर तिला मिळणारे व्याज ही वाढेल. हो की नाही? वि: हो सर. पण मग जर 100 रू साठी 7 रुपये व्याज मिळते तर मग 15000 रुपयांसाठी किती ? हे काढण्यासाठी आपण रू. 15,000 वर मिळणारे व्याज ‘y’ रू असेल असे आपण मानू. मग आता आपण याचे समीकरण मांडू. y/15000 = 7/100 आता आपण y’ ची किंमत काढण्यासाठी दोन्ही बाजूंना 15,000 ने गुणू म्हणून y/15000 × 15000 = 7/100 × 15000 y = 7 × 150 y = 1050 म्हणून विनिताला एकूण 1050 रुपये व्याज मिळेल.