बँक व सरळव्याज Go Back व्याज आकारणी views 3:37 व्याज आकारणी : व्याज:बँक आपल्या ठेवीदारांना बँकेत पैसे ठेवल्याबद्द्द्ल काही रक्कम मोबदला म्हणून देते. किंवा एखाद्याने जर बँकेतून कर्ज घेतले तर त्याच्याकडून मोबदला म्हणून त्या रकमेवर काही रक्कम आकारते. अशा रकमेलाच ‘व्याज’ असे म्हणतात. मुद्दल : बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्जदरास दिलेल्या रकमेला ‘मुद्दल’ असे म्हणतात म्हणजे समजा, विजयने बँकेत 1 वर्षासाठी रु 50,000 ठेवले. म्हणजेच 50,000 रुपये हे विजयचे मुद्दल झाले. आणि या रकमेवर बँकेने त्याला दिलेली रक्कम म्हणजे त्याचे व्याज झाले. दर : आपण बँकेत ठेवलेल्या ठेवींवर किंवा बँकेतून घेतलेल्या कर्जावर व्याज आकारताना एक दर ठरवला जातो. हा व्याजाचा दर प्रत्येक 100 रू. वर दिला किंवा घेतला जातो. हा दर किती काळासाठी आहे हे त्यात ठरवले जाते. व्याजाचा दर द.सा.द.शे असे जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्याचा अर्थ दर साल दर शेकडा असा असतो. म्हणजेच प्रत्येक वर्षासाठी दर शंभर रुपयाला द्यायचे व्याज होय. मुदत : बँकेत ठेवलेली रक्कम किवा बँकेतून कर्ज म्हणून घेतलेली रक्कम म्हणजेच मुद्दल, हे किती कालावधीसाठी वापरली जाते, त्या कालावधीस मुदत असे म्हणतात. प्रस्तावना बँक बँकेमध्ये समाजातील विविध प्रकारच्या लोकांचे व्यवहार बँकेतील खाती चालू खाते व्याज आकारणी सरळव्याज