बँक व सरळव्याज

बँकेतील खाती

views

3:45
बँकेतील खाती : बचत खाते : सर्वांना बचतीची सवय लागावी म्हणून बँकेत बचत खाते उघडण्याची सोय असते. या खात्यामध्ये आपल्याजवळ जी रक्कम जमा झाली असेल ती आपण बँकेत भरू शकतो. आणि जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपण ती रक्कम बँकेतून काढूही शकतो. आपण जी रक्कम बँकेत जमा करतो त्यावर बँक आपल्याला 4% ते 6% व्याज देते. म्हणजे समजा, आपण बँकेत 100 रूपये जमा केले तर बँक आपल्याला त्यावर अधिक 6 रूपये देते. म्हणजे आपल्या खात्यात एकूण 106 रुपये जमा होतात. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की बँक तर आपले पैसे सांभाळते; तरीही ती आपल्यालाच का अधिकचे पैसे म्हणजेच व्याज देते? तर मुलांनो, जेव्हा आपण बँकेत एखादी रक्कम जमा करतो तेव्हा ती रक्कम बँक काही स्वत:कडे नुसतीच ठेवत नाही. तर ती रक्कम ज्यांना कर्ज हवे असते त्यांना कर्जाऊ देते. मग ते कर्ज घरासाठी असो, वाहनासाठी असो किंवा इतर कोणत्याही कारणासाठी असो. आणि त्यांच्याकडून दिलेल्या रकमेवर व्याज घेते. आणि त्या व्याजातून मिळालेले पैसे ती आपल्याला देते. तर अशा प्रकारे बँक आपल्याला आपल्या रक्मेवर 4 ते 6% व्याज देते. आपण बँकेत आपले बचत खाते उघडतो, तेव्हा आपण त्या बँकेचे सभासद झाले आहोत याचा पुरावा म्हणून बँक आपल्याला त्या बँकेचे पासबुक, चेकबुक, एटीएम कार्ड, मोबाईल बँकिंग, एस.एम.एस. बँकिंग, इंटरनेट बँकिंग या सर्व सुविधा देते. या प्रत्येकाची आपण थोडक्यात माहिती घेऊ. पासबुक - पासबुक मध्ये आपण बँकेखात्यातून केलेल्या प्रत्येक व्यवहाराची नोंद असते चेकबुक – चेकबुकद्वारे आपण बँकेतून आपल्या खात्यातून पैसे काढू शकतो. तसेच दुसऱ्याला खात्यात पैसे देऊ शकतो. चेकला मराठीत धनादेश असे म्हणतात. एटीएम कार्ड - एटीएम कार्ड बँक पुरवते. हे एटीएम कार्ड म्हणजे एक चीप असते. या एटीएम कार्डव्दारे आपण त्याच बँकेत न जाताही कधीही, कुठेही व कोणत्याही ATMएटीएम केंद्रातून पैसे काढू शकतो. यासाठी बँक आपल्याला पासवर्ड देते.आणि या पासवर्डच्या मदतीने आपण आपल्या खात्यातील पैसे काढू शकतो. मोबाईल बँकिंग - आज सर्वच लोक मोबाईल वापरतात. त्यामुळे मोबाईलव्दारे आपण आपल्या बँक खात्याचे व्यवहार करू शकतो.