कोन व कोणाच्या जोड्या Go Back चुकीच्या विधानांची कारणे द्या. views 3:35 मुलांनो तुम्ही कोटिकोन आणि पूरक कोन म्हणजे काय ते शिकला आहात. मग मी तुम्हाला काही विधाने सांगते. ती चूक आहेत की बरोबर ते तुम्ही ओळखा. आणि चुकीच्या विधानांची कारणे द्या. शि: दोन लघुकोन परस्परांचे कोटिकोन असू शकतात = वि: सर हे विधान बरोबर आहे. शि: दोन काटकोन परस्परांचे कोटिकोन असू शकतात = वि: हे विधान चूक आहे. कारण ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते, ते दोन कोन परस्परांचे कोटिकोन असतात. येथे दोन काटकोनांच्या मापांची बेरीज 90अंश + 90अंश =180अंश होते. म्हणून ते परस्परांचे कोटिकोन असू शकत नाही. शि: एक लघुकोन व एक विशालकोन हे परस्परांचे कोटिकोन असू शकतात. वि: हे विधान चूक आहे. कारण विशाल कोनाचे माप 90अंश पेक्षा जास्त असते. त्यामुळे एक विशाल कोन आणि एक कोटिकोन या दोघांच्या मापांची बेरीजही 90अंश पेक्षा जास्तच असेल. आणि दोन कोटिकोनांच्या मापांची बेरीज तर 90० असते. प्रस्तावना संलग्न कोन कोटिकोन पूरक कोन चुकीच्या विधानांची कारणे द्या. रेषीय जोडीतील कोन विरुद्ध कोनांचा गुणधर्म बहुभुजाकृतीचे आंतरकोन बाह्यकोनांचा गुणधर्म