कोन व कोणाच्या जोड्या

बाह्यकोनांचा गुणधर्म

views

3:35
त्रिकोणाचा बाह्यकोन : मुलांनो, आता आपण त्रिकोणाचा बाहयकोन म्हणजे काय हे समजून घेऊ.त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यावर जो कोन त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी करतो, त्या कोनाला त्रिकोणाचा बाह्यकोन असे म्हणतात. आपल्याला असे समजते की प्रत्येक त्रिकोणाला सहा बाह्यकोन असतात. बाह्यकोनांचा गुणधर्म : आपण बाहयकोन म्हणजे काय ते समजून घेतल्यावर आता आपण बाह्यकोनांचे गुणधर्म समजून घेऊया. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्या कोनाच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजेएवढे असते.