शैक्षणिक वाटचाल

प्राथमिक शिक्षण

views

4:46
प्राथमिक शिक्षण :- शिक्षण क्षेत्रात सुधारणा करायच्या म्हटले तर सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून करणे गरजेचे होते. प्राथमिक शिक्षण म्हणजे ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते ते शिक्षण होय. यामध्ये पहिली ते आठवी या इयत्तांचा समावेश होतो. १९८८ मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी म्हणजे प्राथमिक शिक्षण देशाच्या कानाकोपऱ्यात व खेड्यापाड्यात पोहोचविण्यासाठी आणि शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी ‘खडू – फळा’ योजना सुरू केली. ही योजना ‘ऑपरेशन ब्लॅक बोर्ड’ या नावाने ओळखली जाते. शालेय वातावरण उत्साही करण्याच्या भूमिकेतून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शाळांचा दर्जा सुधारणे, किमान शैक्षणिक साधनांची पूर्तता करणे म्हणजे शाळांना त्या गोष्टी उपलब्ध करून देणे, प्रत्येक शाळेला सुयोग्य अशा दोन वर्गखोल्या, मुले व मुली यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, दोन शिक्षकांपैकी एक स्त्री शिक्षिका, फळे, नकाशे, खेळणी, प्रयोगशाळा साहित्य, छोटेसे ग्रंथालय, मैदान, क्रीडा साहित्य यांसारख्या सुविधांसाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिला. या योजनेमुळे प्राथमिक शिक्षणाचा प्रसार जलद गतीने होण्यास मदत झाली.