शैक्षणिक वाटचाल

कोठारी आयोग

views

3:17
कोठारी आयोग :- भारतातील हा सहावा शैक्षणिक आयोग १९६४ मध्ये स्थापन करण्यात आला. डॉ. डी. एच. कोठारी या आयोगाचे अध्यक्ष होते आणि जे.पी. नाईक यांचे मोलाचे योगदान या आयोगास आहे. यापूर्वीच्या आयोगांनी शिक्षणाच्या एका विशिष्ट स्तराचाच विचार केला होता. कोठारी आयोगाने मात्र शिक्षणाच्या सर्व स्तरांचा आणि अंगांचा विचार केला. भारतात शैक्षणिक क्रांती घडविण्यासाठी आयोगाने ज्या तीन गोष्टीवर भर दिला. त्या म्हणजे 1) अंतर्गत परिवर्तन 2) गुणात्मक बदल 3) शैक्षणिक सुविधांचा विस्तार या होत. या आयोगाचा अहवाल मोठा आहे. त्याची सुरुवात “भविष्यकाळात भारताचे भवितव्य वर्गखोल्यांतून घडणार आहे.” या वाक्याने होते. या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील आकृतीबंध १० + २ + ३ चा पुरस्कार केला. १९७२ पासून ही व्यवस्था अंमलात आली. कोठारी आयोगाची शिक्षणाची उद्दिष्टे :- 1)लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन 2) शिक्षणाचे आधुनिकीकरण 3) सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता 4) सामाजिक, नैतिक, अध्यात्मिक मूल्यांची जोपासना 5) शिक्षण व उत्पादकता