शैक्षणिक वाटचाल

उपग्रह वापर

views

5:05
"उपग्रह वापर :- शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर करण्यासाठी भारताने १९७५ मध्ये यश मिळविले. या कार्यासाठी इस्त्रोचे (ISRO) भारतातील अवकाश संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांनी त्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (SAC) या गुजरातमधील अहमदाबाद येथील अंतरीक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली ‘साईट’ (सॅटेलाईट इंसट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट) हा शैक्षणिक कारणासाठी प्रयोग करण्यात आला. ‘उपग्रहाद्वारे शिक्षणप्रणाली’ ही कल्पना येथून पुढे आली. या उपक्रमासाठी अमेरिकेने भारताला मदत केली होती. यातूनच ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची सोय करणे शक्य झाले.आज आपण संगणक, प्रोजेक्टर, टॅब याद्वारे शिक्षण अधिक सविस्तर व खोल स्तरावरती घेऊ शकतो, ते या उपग्रहामुळेच शक्य झाले आहे.""