शैक्षणिक वाटचाल

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT)

views

4:33
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) :- यालाच मराठीत ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ असे म्हणतात. या संस्थेची स्थापना १ सप्टेंबर १९६१ रोजी दिल्ली येथे करण्यात आली. ही संस्था केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्व धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करते. हेच या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. शिक्षण क्षेत्रातील संशोधन विकास, प्रशिक्षण (Training), विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना म्हणजे अभ्यासक्रमात बदल करून नवीन पाठ्यपुस्तके तयार करणे या सर्व बाबींची जबाबदारी केंद्र शासनाने NCERT कडे सोपवली आहे. या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशातील राज्य सरकारला प्राथमिक वा माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात सहकार्य वा मार्गदर्शन NCERT करते. शिक्षकांस अध्यापन कार्यात उपयुक्त पडतील अशा मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण अध्ययन (शिकणे), अध्यापन तंत्राचा विकास करणे, राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करणे असे उपक्रम या संस्थेद्वारे राबविले जातात. तसेच राज्य सरकार आणि इतर शैक्षणिक संस्थांना शिक्षणाचे आदान – प्रदान करणे, त्यांना सल्ला देणे, शालेय शिक्षणात बदल करणे यांसारखी कामेही या संस्थेमार्फत केली जातात.