शैक्षणिक वाटचाल

संशोधनसंस्था

views

3:11
संशोधनसंस्था – विज्ञान :स्वातंत्र्योत्तर काळात देशात वैज्ञानिक संशोधनाला गती मिळावी, त्या संशोधनाचे फायदे सर्वांना मिळावेत म्हणून १९५० मध्ये “कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च”, या संस्थेची स्थापना झाली. पदार्थविज्ञान, रसायन, औषधे, अन्नप्रक्रिया, खाणकाम अशा विविध क्षेत्रांत संशोधन सुरू झाले. या संस्थांमधील संशोधनाचा फायदा उद्योगधंद्यांना व्हावा म्हणून औद्योगिक संस्थांबरोबर करार करण्यात आले. त्यामुळे भारताला परदेशातून आयात करावा लागणारा माल आपल्याच देशात तयार होऊ लागल्याने आयात कमी झाली. त्यामुळे परकीय चलनाची बचत झाली. या संस्थेने महत्त्वाच्या गोष्टींचे संशोधन करण्यावर भर दिला. या संस्थेमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत संधी उपलब्ध करून देण्याचे काम या संस्थेने केले. या संस्थेने मतदानाच्या वेळी वापरण्यात येणारी शाई, हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग (टी.बी.) यांवरील औषधे, पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान (Water filter Technology), बांबूच्या उत्पादन काळात कपात या गोष्टी केल्या. डीएनए फिंगर प्रिंटिंग तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम वापरण्यास सुरुवात या संस्थेने केली. फिंगर प्रिंटींग म्हणजे व्यक्तीच्या बोटाच्या ठशावरून व्यक्ती ओळखणे. ज्याचा उपयोग आधार कार्ड नोंदणीसाठी, गुन्हेगार ओळखण्यासाठी होतो. तसेच या संस्थेने अंदमान बेटावर राहणाऱ्या आदिवासींचा जनुकीय अभ्यास करून त्या जमाती साठ हजार वर्षे जुन्या आहेत. हे सिद्ध केले.