इतिहासाची साधने

इमारती व वास्तू भाग २

views

05:11
इमारती व वास्तू भाग २:- इंग्रजाच्या काळात बांधलेल्या काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत, तर काही इमारतींमध्ये संग्रहालये उभारण्यात आली. उदा. अंदमान बेटावरील सेल्युलर जेल. सेल्युलर जेल अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेयर येथे आहे. इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांना कैदी म्हणून ठेवण्यासाठी याची निर्मीती केली होती. हा तुरुंग भारताच्या मुख्य भूमीपासून हजारो किलोमीटर दूर समुद्रातील बेटावर अतिशय दुर्गम भागात असल्याने त्याला काळे पाणी किंवा त्या जेलमध्ये असलेल्या कैद्यांच्या शिक्षेला काळ्या पाण्याची शिक्षा म्हणत. या जेलमध्ये, स्वातंत्र्यवीर सावरकर, गणेश सावरकर यांसारख्या क्रांतिकारकांनी शिक्षा भोगली आहे. आज हे जेल संग्रहालयाच्या रूपात जतन केले आहे. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयी माहिती मिळते. तसेच इतर सैनिकांना ठेवलेल्या खोलींमध्ये भिंतींवर त्या – त्या क्रांतिकारकांची नावे लिहिली आहेत. त्या काळच्या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणांस त्यावेळचा इतिहास, इमारती बांधण्याची कला, इमारतींच्या स्वरूपावरून त्यावेळची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते. अंदमानच्या सेल्युलर जेलला भेट दिल्यावर आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयी माहिती मिळते. मुंबईतील मणिभवन येथेही एक संग्रहालय आहे. महात्मा गांधी जेव्हा मुंबईत येत तेव्हा ते मणिभवन या इमारतीत राहात असत. आता या इमारतीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला असून महात्मा गांधीच्या वापरातील वस्तूंचे एक संग्रहालय तेथे स्थापन करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील वर्धा जिल्हयातील सेवाग्राम आश्रम आहे. ३०० एकर जमिनीवर हा आश्रम वसलेला आहे. स्वत: गांधी व त्यांचे सहकारी येथे राहात असत. याठिकाणी बापू कुटी असून तेथे गांधीजी राहत असत. मणिभवन किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यावर गांधी युगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.