इतिहासाची साधने Go Back ध्वनिमुद्रिते (रेकॉर्डस) views 04:41 ध्वनिमुद्रिते (रेकॉर्डस) :- ध्वनिमुद्रिते म्हणजे एखादा आवाज मुद्रित (रेकॉर्ड) करणे होय. छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण तंत्राचा शोधही महत्त्वाचा आहे. ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्डस ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. म्हणजे आपण इतिहासातील काही गोष्टी, घटना, भाषणे फक्त ऐकू शकतो. रेडिओवर आपण कोणतीही गोष्ट फक्त ऐकू शकतो, पाहू शकत नाही. म्हणजेच रेडिओ हे सुदधा श्राव्य साधन आहे. आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, ध्वनिमुद्रित स्वरूपात आजही उपलब्ध आहेत. त्या साधनांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. उदा. स्वत: रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जण गण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण किंवा शिकागो परिषदेत स्वामी विवेकानंदांनी केलेले भाषण किंवा भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरूंनी स्वतंत्र भारतातील लोकांना उद्देशून केलेले भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून करता येतो. चित्रपट :- चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. मुलांनो चित्रपट हे दृक्-श्राव्य साधन आहे. म्हणजे यात आपण प्रत्यक्ष पाहूही शकतो व ऐकूही शकतो. दोन्ही गोष्टी एका वेळी होत असल्याने हे एक प्रभावी साधन म्हणून ओळखले जाते. विसाव्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठया प्रमाणात प्रगती झाली. संपूर्ण भारतातील पहिला चित्रपट इ.स.१९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी निर्माण केला. ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट बनवून भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. म्हणजे तेव्हापासून भारतात चित्रपट बनविले जाऊ लागले. भारतीय स्वातंत्र्यलढयातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चलेजाव आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण प्रसंगांच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहेत. प्रस्तावना इमारती व वास्तू भाग २ लिखित साधने नकाशे व आराखडे मौखिक साधने दृक्, श्राव्य आणि दृक् - श्राव्य साधने ध्वनिमुद्रिते (रेकॉर्डस)