इतिहासाची साधने

मौखिक साधने

views

02:51
मौखिक साधने :-मौखिक म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला मुखाद्वारे सांगितला जाणारा इतिहास होय. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये स्फूर्तिगीते, लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंगवर्णने, मुलाखती, मेळे, जलसे, कलापथके या साधनांचा समावेश होतो. या सर्व गोष्टी मुखाद्वारे सांगितल्या किंवा म्हंटल्या जातात. त्यांच्याद्वारे आपल्याला इतिहास समजतो. स्फूर्तिगीते :- स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. या स्फूर्ति गीतांमागील उद्देश हाच होता की त्यांच्यातून लोकांना प्रेरणा मिळावी, त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागृत व्हावे. तसेच क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाची त्यांना माहिती व्हावी. इंग्रजांच्या विरुद्धचा लढा आणखी मजबूत व्हावा. या स्फूर्तिगीतांपैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. म्हणजे लिहून ठेवलेली आहेत. परंतु त्यातील अनेक अप्रकाशित आहेत. पोवाडे :- पोवाडे हे मौखिक साधन शिवाजी महाराजांनंतरच्या काळात प्रसिद्ध झाले होते. पोवाड्यांमधून ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तींच्या कार्याविषयी माहिती मिळते. ब्रिटिश राजवटीत १८५७ चा स्वातंत्र्यलढा, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यांवर आधरित पोवाडे रचले गेले. हे पोवाडे ऐकून, त्यात वर्णिलेले स्वातंत्र्यसैनिकांचे शौर्य ऐकून लोकांमध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण व्हावे, यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत असे. महात्मा फुलेंनी निर्माण केलेल्या सत्यशोधक समाजाने, स्वातंत्र्यलढयाप्रमाणेच पोवाड्यांच्या माध्यमातून समाजातील लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कार्य केले. मुंबई महाराष्ट्रात असावी म्हणून जो संयुक्त महाराष्ट्र लढा दिला गेला त्यांसारख्या घटनांवरही पोवाड्यांची रचना केली गेली आहे.