इतिहासाची साधने Go Back दृक्, श्राव्य आणि दृक् - श्राव्य साधने views 04:01 दृक्, श्राव्य आणि दृक् - श्राव्य साधने :-आपण नेहमी एक वाक्य ऐकतो ते म्हणजे आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अनेक प्रकारची माहिती व साधने आपल्याकडे उपलब्ध झाली आहे. यामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इ. कलांचा विकास झाला आहे. या विकासामुळे त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे (फोटो), ध्वनिमुद्रिते (रेकॉर्डस), चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो. छायाचित्रे :- छायाचित्रे म्हणजे फोटो होय. छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत. दृक् म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तू होय. छायाचित्रणे कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. या छायाचित्रांमधून आपणांस व्यक्ती तसेच प्रसंग कसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. म्हणजे ती माहिती आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकतो. उदा. स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक आपण पाहिले नाहीत. त्यावेळी आपला जन्मही झाला नसेल. परंतु त्यांची छायाचित्रे बघून आपण हे क्रांतिकारक कसे होते ते सांगू शकतो. स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद यांच्या छायाचित्रावरून ते कसे होते ते आपल्याला समजते. प्रस्तावना इमारती व वास्तू भाग २ लिखित साधने नकाशे व आराखडे मौखिक साधने दृक्, श्राव्य आणि दृक् - श्राव्य साधने ध्वनिमुद्रिते (रेकॉर्डस)