युरोप आणि भारत

प्रबोधनयुग भाग २

views

03:58
प्रबोधनयुग भाग २ :-प्रबोधन काळात कला आणि साहित्यातून मानवी भावभावना, सुखदुःख, आनंद यांचे चित्रण होऊ लागले. त्यापूर्वी साहित्यात देवीदिकांच्याच गोष्टी सांगितल्या जात. चित्रकलेत चित्रेही देवांचीच काढली जात. मूर्ती किंवा पुतळे हेही देवांचेच घडवले जात. माणूस हा दुय्यम समजला जात असे. धर्माचा जबरदस्त पगडा माणसांवर होता. चर्च ही मोठी शक्तिशाली यंत्रणा होती. पण प्रबोधन काळात माणसे नव्याने विचार करू लागली. आणि धर्मापेक्षा माणसाला, त्याच्या बुद्धीला, कर्तुत्वाला महत्त्व प्राप्त झाले. शिल्पकला, चित्रकला यांसारख्या कला व नाटके, पुस्तके यांसारख्या साहित्यातून मानवाच्या भावभावनांना महत्त्व दिले जाऊ लागले. ते त्यांच्या माध्यमातून व्यक्त केले जाऊ लागले. प्रबोधन काळापूर्वी विशिष्ट भाषांमधूनच म्हणजे ग्रीक आणि लॅटिनमधून साहित्य निर्मिती होत असे. ते विशिष्ट वर्गातील लोकांनाच समजत असे. असा वर्ग साहित्यातील माहितीचा, तत्त्वज्ञानाचा आपल्याला हवा तसा अर्थ लावत असे. आणि समाजातील लोकांचे शोषण करीत असे. परंतु प्रबोधन काळात मात्र लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषेतून साहित्य निर्माण होऊ लागले. पूर्वी पुस्तके हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलली जात असत. त्यामुळे त्याच्या मोजक्याच प्रती निर्माण होत. एखादे पुस्तक हवे असल्यास त्याची प्रत हाताने लिहून तयार करावी लागत असे. एवढी सवड सामान्य माणसांना नसल्याने त्यांच्यापर्यंत ग्रंथ पोहोचतच नसत. इ.स १४५० च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला. एका वेळी पुस्तकाच्या अनेक प्रती छापून तयार होऊ लागल्या. त्यामुळे पुस्तके स्वस्त झाली. छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहचू लागले. त्यामुळे लोकांना स्वतः वाचन व अभ्यास करून साहित्यातील बाबींचा अर्थ लावणे सोपे झाले.