युरोप आणि भारत

धर्मसुधारणा चळवळ

views

04:53
धर्मसुधारणा चळवळ : प्रबोधकाळात परंपरागत ज्ञान, अंधश्रद्धा, रूढी परंपरा यांना आव्हान दिले जाऊ लागले. निरीक्षणशक्ती आणि प्रयोगशीलता यांच्या आधारे निसर्गातील माहीत नसलेल्या ज्ञानाची उकल वैज्ञानिक करू लागले. त्यामुळे स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला. मुलांनो, रोमन कॅथलिक चर्च हे जगातील सर्वात मोठे ख्रिश्चन धर्माचे चर्च आहे. जगातील सुमारे अब्ज लोक कॅथलिक चर्चचे अनुयायी आहेत. या चर्चमधील प्रमुख लोकांनी सांगितलेल्या गोष्टी युरोपातील सर्व ख्रिश्चन लोकांना मान्य कराव्या लागत असत. यातील प्रमुख लोक समाजातील लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन लोकांना धर्माची भीती घालून आपले हित साध्य करीत असत. धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत असत. या सर्वांच्या विरोधात युरोपात जी चळवळ सुरु झाली तिला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात. बायबल हा ख्रिस्ती धर्मग्रंथ लॅटिन भाषेत होता. ती भाषा सर्वसामान्य लोकांना समजत नसे. धर्मसुधारणा चळवळीच्या काळात बायबलची भाषांतरे इंग्रजी, फ्रेंच अशा लोकभाषांमध्ये केली गेली. त्यामुळे लोकांना बायबलमधील शिकवण व रोमन कॅथलिक चर्चची शिकवण यांमध्ये फरक जाणवला. आणि त्यांच्या लक्षात आले की हे ख्रिस्ती धर्मगुरु आपली फसवणूक करीत आहेत, म्हणून लोकांनी चर्चमधील प्रचलित रीतींचा निषेध केला. धर्मसुधारणा चळवळ युरोपातील अनेक देशांमध्ये पसरली. तरुण मध्यमवर्गाने या चळवळीला पाठिंबा दिला. या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात कर्मकांड, रूढी, परंपरा यांना सोडून माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धीला पटणाऱ्या तत्त्वांना महत्त्व प्राप्त झाले.