युरोप आणि भारत

बंगालमध्ये ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया

views

05:41
बंगालमध्ये ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया: खऱ्या अर्थाने ब्रिटिश सत्तेचा पाया भारतात कसा घातला गेला याची माहिती आता आपण घेणार आहोत. बंगाल प्रांत हा भारतातील इतर प्रांतांपेक्षा अतिशय समृद्ध असा प्रांत होता. इ.स १७५६ झाली सिराज उद्दौला हा बंगालचा नवाब बनला. इस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी त्यांना व्यापार करण्यासाठी मिळालेल्या परवानगीचा गैरवापर करत असत. इंग्रजांनी सिराज उद्दौला या बंगालच्या नवाबाची परवानगी न घेता कोलकता येथील त्याच्या वखारीभोवती तटबंदी उभारली. तटबंदी म्हणजे किल्ल्याच्या संरक्षणासाठी सभोवती बांधलेली भिंत असते, तशी भिंत. ही तटबंदी बांधताना ब्रिटिशांनी नवाबाची परवानगी घेणे गरजेचे होते. परंतु इंग्रजांनी तसे न केल्याने सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यात संघर्ष सुरु झाला. सिराज उद्दौलाने स्वारी करून इंग्रजांची कोलकात्याची वखार आपल्या ताब्यात घेतली. या घटनेने इंग्रजांमध्ये नवाबाबद्दल चीड निर्माण झाली. कारण यात बरेच सैन्य व अधिकारी मारले गेले होते. म्हणून याचा सूड घेण्याचे इंग्रजानी ठरविले. खूप महत्त्वकांक्षी, चतुर, बुद्धिमान अशा ‘रॉबर्ट लाईव्ह’ या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता पुन्हा जिंकून घेतले. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने चालाखीने सिराज उद्दौलाचा सेनापती मीर जाफर यास नवाबपदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवून घेतले. इ. स १७५७ मध्ये प्लासीच्या रणमैदानावर सिराज उद्दौलाचे लष्कर व इंग्रज यांची गाठ पडली. युद्धाला सुरुवात होताच सेनापती मीर जाफरने बघ्याची भूमिका घेतली, व नंतर इंग्रजांना जाऊन मिळाला. उद्दौलाचा पूर्ण पराभव होऊन तो पळून गेला. पुढे मीर जाफरचा पुत्र मीरान याने त्याला पकडून ठार केले. या लढाईत ‘लढाई’ अशी झालीच नाही. या लढाईत फक्त ७ इंग्रज मारले गेले. अशा प्रकारे इंग्रजांनी शस्त्रबळाचा वापर न करता फसवून नवाबाचे सैन्य फोडून, फंदफितुरीने प्लासीची लढाई जिंकली.