युरोप आणि भारत

भांडवलशाहीचा उदय

views

03:33
भांडवलशाहीचा उदय: नव्या सागरी मार्गांचे शोध लागले. त्यामुळे युरोप खंड आणि आशिया खंडातील देशांमधील व्यापार नव्याने सुरू झाला. औद्योगिक क्रांतीमुळे युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात वस्तूंची निर्मिती होऊ लागली. त्यामुळे ते विकण्यासाठी आशियाई देश हे चांगली बाजापेठ असणारे देश होते. त्यामुळे सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार करण्यास सुरुवात केली. यातूनच व्यापारी लोकांनी आपल्या-आपल्या हिश्याचे ठरावीक पैसे भरून म्हणजेच भागभांडवल जमा करून कंपन्या सुरु केल्या. अशा अनेक कंपन्या या काळात उदयास आल्या. पश्चिमेकडील देशांनी पूर्वेकडील देशांशी केलेल्या व्यापारात खूप फायदा मिळत होता. या व्यापारातूनच देशांची आर्थिक भरभराट किंवा प्रगती होत असे. याचा फायदा देशाला होत होता. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. तसेच कर, जकात यांसारख्या व्यापारी सवलती या कंपन्यांना दिल्या जाऊ लागल्या. या व्यापारामुळे युरोपीय देशांत पूर्वेकडील देशांतून मोठ्या प्रमाणात धन प्राप्त होऊ लागले. त्यामुळे युरोपीय देशांमधील धन, संपत्तीचे साठे वाढू लागले. मोठ्या प्रमाणात पैसा या देशांना मिळू लागला. या संपत्तीचा उपयोग अजून कारखाने काढणे, उद्योगधंदे वाढविणे, व्यापारात अधिक भांडवल घालणे असा केला जाऊ लागला. उद्योगधंदे वाढले. उत्पादन वाढले आणि व्यापारही वाढला. त्यामुळे देशांच्या अर्थव्यवस्था सुधारण्यास फायदा झाला. अशा तऱ्हेने युरोपीय देशांत भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला.