१८५७ चा स्वातंत्र्यलढा

१८५७ पूर्वीचे लढे भाग २

views

3:37
१८५७ पूर्वीचे लढे भाग २ :- भारतातील आदिवासी व वनात राहणाऱ्या जमातींनीही इंग्रज सत्तेविरुद्ध बंड केले. या जमाती भटक्या स्वरूपाचे जीवन जगत. त्यांचे संपूर्ण जीवन हे जंगलातील साधनसंपत्तीवर अवलंबून होते. उदा. शिकार, मासेमारी, कंदमुळे गोळा करणे, लाकूडफाटा तोडणे, शेती यांसारख्या व्यवसायांतून मिळणाऱ्या गोष्टींवर हे लोक जगत असत. ब्रिटिशांनी जंगलविषयक कायदे करून त्यांना निसर्गत: मिळालेल्या हक्कांवर गदा आणली. त्याचा राग मनात येऊन बिहार, छोटा नागपूर परिसरात कोलाम, ओडिशा – गोंड, बिहार – संथाल या भागातील जमातींनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले. तर महाराष्ट्रात – भिल्ल, कोळी, रामोशी यांनी लढे दिले. महाराष्ट्रातील कोल्हापूर परिसरात गडकरी, कोकणात फोंड – सावंत यांनी इंग्रजी सत्तेला आव्हान दिले. १८५७ च्या उठावापूर्वी देशाच्या निरनिराळ्या भागांत काही जमीनदार आणि राजांनीही लढे दिले. ईस्ट इंडिया कंपनीचे जे लष्कर होते. त्यात अनेक हिंदी सैनिक होते. हिंदी शिपायांना अत्यंत अपमानास्पद व अन्यायी वागणूक दिली जात होती. त्यामुळे १८०६ साली वेल्लोर येथे तर १८२४ साली बराकपूर येथे हिंदी सैनिकांनी उठाव केले.