१८५७ चा स्वातंत्र्यलढा

१८५७ चा लढा अयशस्वी होण्याची कारणे भाग १

views

4
१८५७ चा लढा अयशस्वी होण्याची कारणे भाग १ :- लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही :- हा लढा ठरलेल्या वेळेच्या आधी झाल्यामुळे तो संपूर्ण भारतात एकाच वेळी झाला नाही. हे या लढ्याच्या अपयशाचे पहिले कारण आहे. उत्तर भारतात लढ्याची तीव्रता अधिक होती. तर दक्षिण हिंदुस्थानतील महाराष्ट्र, म्हैसूर, मद्रास, केरळ इ. प्रदेशांत शांतता राहिली. तसेच उत्त्तेकडील राजपुताना, पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारत हे प्रदेश लढयापासून दूर राहिले. पंजाबमध्ये तर काही हालचाल दिसली नाही. पंजाबचे शीखांचे राज्य इंग्रजांनी नुकतेच खालसा करून आपल्या साम्राज्यात विलीन केले होते. तरीही तेथील स्वाभिमानी व शूर लोक शांतच राहिले. एवढेच नव्हे तर पंजाबी शीखांच्या फौजा इंग्रजांशी एकनिष्ठ राहिल्या. पंजाब बंड करून उठला असता तर चित्र वेगळेच दिसले असते. सर्वमान्य नेत्याचा अभाव :- १८५७ च्या उठावात हिंदी लोकांना बंडवाल्यांना सर्वमान्य नेता मिळू शकला नाही. राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कुवरसिंह यांनी शिपायाचे नेतृत्व स्वीकारून अनेक लढायांत पराक्रम गाजवला. हे खरे असले तरी त्यांच्यापैकी कोणी एकजण सर्वमान्य नेता बनू शकला नाही. सर्वांना मान्य होईल असे नेतृत्व बंडवाल्यांना मिळू न शकणे हे लढ्याच्या अयशस्वी होण्याचे मोठे कारण आहे.राजे – रजवाड्यांच्या पाठिंब्याचा अभाव त्यामुळे इंग्रजांना बंड वाल्यांशी लढा दयायला अधिक ताकद मिळाली.