१८५७ चा स्वातंत्र्यलढा

लढ्याची व्याप्ती

views

3:36
लढ्याची व्याप्ती :- अवघ्या २४ तासांत दिल्ली बंडवाल्यांनी ताब्यात घेतली. त्यामुळे सैनिकांचा आत्मविश्वास वाढला. कालपर्यंत गुलाम असलेल्या बहादूरशहाला हिंदुस्थानचा सम्राट बनविला. यामुळे भारतातील इतर ठिकाणी असलेल्या हिंदी सैनिकांना यातून प्रेरणा मिळाली. मीरत येथील शिपायांचे बंड, त्यांची दिल्लीवरील चाल, दिल्लीत बंडवाल्यांना मिळालेला विजय या बातम्या संपूर्ण भारतभर पसरल्या. लवकरच उठावाचे लोण उत्तर भारतामध्ये पसरले. बिहारपासून राजस्थानमधील राजपुतांपर्यंत इंग्रजी छावणीतील हिंदी सैनिकांनी बंड करायला सुरुवात केली. लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी यांसारख्या ठिकाणी उठावास प्रारंभ झाला. उत्तर भारतात जसे उठाव होत होते, तसेच उठाव दक्षिण भारतातही होऊ लागले. सातारा छत्रपतीचे वारसदार शहाजी प्रतापसिंह व कारभारी रंगो बापूजी, कोल्हापूरचे चिमासाहेब, नरंगुदचे बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्हयातील संगमनेरजवळील भागोजी नाईक हे या लढ्यात सर्वात पुढे होते. नाशिक जिल्हयातील पेठ, सुरगाण्याच्या राणीसारख्या स्त्रियाही यात सामील झाल्या. १८५७ साली खानदेशात कजारसिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्ल जमातीतील लोकांनी उठाव केला, तर सातपुडा परिसरात शंकरशहांनी लढ्याचे नेतृत्व केले. खानदेशातील उठावात चारशे भिल्ल स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. मुलांनो यावरून आपल्या लक्षात येईल की जवळजवळ समाजाच्या सर्व स्तरांतून उठाव झाले होते.