१८५७ चा स्वातंत्र्यलढा

राजकीय कारणे

views

3:02
राजकीय कारणे :१७७५ पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्ये ताब्यात घेतली होती. पुढे डलहौसीने अनेक संस्थाने विविध कारणांनी खालसा केली. गैरकारभाराचे निमित्त पुढे करून अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले. तर सातारा, नागपूर, झांशी ही संस्थाने तेथील राजाचा दत्तकपुत्रांचा वारसा हक्क नामंजूर करून खालसा केली. डलहौसीच्या या धोरणामुळे भारतीयांमध्ये अविश्वासाचे वातावरण वाढत गेले. सामाजिक कारणे :- लॉर्ड बेंटिंक, लॉर्ड डलहौसी यांसारख्या काही सुधारणावादी इंग्रज राज्यकर्त्यांनी कायदे करून हिंदी समाजात सुधारणा घडविण्याचा प्रयत्न केला. सतीबंदी कायदा, बालविवाहप्रतिबंधक कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा इ. कायदे करण्यामागची राज्यकर्त्यांची भूमिका योग्य होती, पण सामान्य लोकांना इंग्रज आपल्या चालीरीती, रूढी, यांत ढवळाढवळ करत आहेत, असे वाटू लागले. हिंदुस्थानामधील पारंपरिक धर्मशास्त्रांचा अभ्यास संस्कृत, अरबी, फारसी भाषांचे अध्ययन इ. बाबी आता इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे कमी महत्त्वाच्या बनून मागे पडू लागल्या. पूर्वी राज्यकारभाराची भाषा फारसी होती. आता तिची जागा इंग्रजीने घेतली. आता इंग्रजी शिक्षण घेणे प्रतिष्ठेचे झाले. त्यामुळे लोकांचा कल इंग्रजी भाषेकडे वाढला. त्यामुळे आतापर्यंत प्रतिष्ठा असणारा हिंदू पंडितांचा व मुसलमान मुल्ला – मौलवीचा वर्ग असंतुष्ट झाला.