केंद्रीय कार्यकारी मंडळ

राष्ट्रपती

views

2:27
भारतीय राज्यघटनेच्या कलम ५२ नुसार भारतासाठी राष्ट्रपतींची तरतूद केली आहे. तर कलम ५३ नुसार देशाचे सर्व कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींना असतील. राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत. राष्ट्रपतींचे पद अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे असून ते भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात. संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना दिली आहे. आपल्या देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. असे असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ राज्यकारभार करते. म्हणूनच राष्ट्रपती हे नामधारी संविधानात्मक प्रमुख आहेत, तर प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत. राष्ट्रपती हे फक्त नावापुरते प्रमुख असतात. खऱ्या अर्थाने सर्व निर्णय घेण्याची व देशाचा कारभार करण्याचा अधिकार प्रधानमंत्र्याकडे असतो. मात्र घेतलेले निर्णय राष्ट्रपतींना कळविणे किंवा त्यावर राष्ट्रपतींची संमती घेणे, हे त्यांना बंधनकारक असते.